नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यात आणि मिझोरममध्ये मंगळवारी मतदान झाले. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या मंगळवारी झालेल्या पहिल्या टप्प्यात प्राथमिक आकडेवारीनुसार ७०.८७ टक्के मतदान झाले. येथील ९० विधानसभा मतदारसंघांपैकी पहिल्या टप्प्यातील २० मतदारसंघांत मतदान झाले. त्यापैकी दहा जागांवर सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत आणि उर्वरित दहा जागांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिझोरममध्ये एकाच टप्प्यात ७७ टक्क्यांवर मतदान झाले. दुर्गम भागातील जिल्ह्यांतील अंतिम आकडेवारी अद्याप मिळाली नाही. त्यामुळे मिझोरममध्ये ८० टक्क्यांवर मतदानाची आकडेवारी जाण्याची शक्यता अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी एच. लियानझेला यांनी दिली. मतदान केंद्रात वेळेत पोहोचलेल्या पण रांगेत असलेल्या मतदारांना वेळ संपल्यानंतरही मतदानाचा हक्क बजावता आला.

हेही वाचा >>> भाजप सरकारने केलेल्या सुधारणा अदृश्य; अमित शहा यांची टीका

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात छत्तीसगडमधील २० जागांसाठी मंगळवारी पोलीस आणि निमलष्करी दलाच्या कडेकोट बंदोबस्तात मतदान झाले. या टप्प्यासाठी पाच हजार ३०४ मतदान पथके तयार करण्यात आली असून २५ हजार २४९ मतदान कर्मचारी तैनात कले होते. मिझोरमचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी एच. लियानझेला यांनी सांगितले, की मिझोरमच्या ११ जिल्ह्यांत सकाळी सातपासून सुरू झालेले मतदान शांततेत झाले. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही. मतदानापूर्वी म्यानमारची ५१० किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आणि बांगलादेशची ३१८ किमी सीमा प्रतिबंधित करण्यात आली होती.

मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी ऐझॉल येथील मतदान केंद्रांत मतदानाचा हक्क बजावला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथे मतदान यंत्रांत (ईव्हीएम) तांत्रिक बिघाडाची तक्रार नोंदवली गेली. त्यानंतर ते घरी परतले आणि सकाळी नऊ वाजून ४० मिनिटांनी परत येऊन त्यांनी मतदान केले.

भूसुरुंग स्फोटात ‘सीआरपीएफ’ निरीक्षक जखमी

राज्याच्या नक्षलग्रस्त भागात मंगळवारी स्वतंत्र घटनांत नक्षलवाद्यांच्या सुरक्षा दलांशी चकमकी घडल्या. सुकमा जिल्ह्यात भूसुरुंगाच्या स्फोटात सीआरपीएफचा एक निरीक्षक जखमी झाला. कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी ‘एके-४७ रायफल’ जप्त केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mizoram registers 77 percent voter turnout chhattisgarh records nearly percent zws