घरात लग्नाची जय्यत तयारी सुरू असताना नवरी मुलगीच पळून गेल्याची घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. तामिळनाडू येथील भवानीसागर विधानसभा क्षेत्राचे आमदार एस ईश्वरन यांच्यासोबत हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील निमंत्रणही देण्यात आलं होतं. 12 सप्टेंबर रोजी ईश्वरन यांचं लग्न ठरलं होतं. आमदाराने मोठ्या उत्साहाने विवाहाची तयारी केली होती. मुलीच्या घरीही लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. मात्र, अचानक नवरी मुलगीच पळून गेल्याची बातमी आली. तेव्हापासून परिसरात सर्वत्र याची चर्चा रंगली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in