राजकीय व्यक्तींच्या संपत्तीचे सर्वसामान्यांना मोठे अप्रूप असते. त्यांच्या संपत्तीत दरवर्षी होणारी वाढ पाहता अनेकांचे डोळे दिपून जातात. देशातील आमदारांचे वार्षिक उत्पन्न सरासरी २४.५९ लाख रूपये असल्याचे कागदोपत्री उघड झाले आहे. भारतातील सर्वात श्रीमंत आमदारामध्ये कर्नाटक आघाडीवर आहे. कर्नाटकातील २०३ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न एक कोटी ११ लाख आहे. भारताच्या दक्षिण विभागातील ७११ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ५१.९९ लाख आहे, तर पूर्व भागातील ६१४ आमदारांचे सगळ्यात कमी म्हणजे ८.५३ लाख रुपये आहे. छत्तीसगडमधील ६३ आमदारांचे सरासरी उत्पन्न ५.४ लाख रुपये असून झारखंडमधील ७२ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ७.४ लाख आहे. पाचवी ते १२ वीपर्यंत शिक्षण असलेल्या १ हजार ५२ आमदारांचे वार्षिक उत्पन्न ३१.०३ लाख रुपये, पदवीधारक आणि पुढील शिक्षण असलेल्या १ हजार ९९७ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न २०.८७ लाख रुपये, तर आठवी पास १३९ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ८९.८८ लाख आहे. ज्या आमदारांनी अशिक्षित असल्याचे सांगितले आहे त्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ९.३१ लाख रुपये आहे.
८वी पास आमदारांचे वार्षिक उत्पन्न ९० लाख
कर्नाटकातील २०३ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न एक कोटी ११ लाख आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-09-2018 at 11:45 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mlas who had only passed class 8 were the wealthiest with an average income of rs 89 9 lakh