मनसे अध्यक्ष राज ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी कोलकाता येथे रवाना झाले आहेत. ९ ऑगस्ट रोजी मनसेचा ईव्हीएम विरोधात मोर्चा आहे. ईव्हीएम नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी मनसेने केली आहे. बॅलेट पेपरचीच मागणी करा यासाठी राज ठाकरे सगळ्या विरोधकांची भेट घेत आहेत. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आणि निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या अशीही मागणी त्यांनी केली. त्यानंतर याचसंदर्भात त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोनिया गांधी आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळातही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता राज ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. ईव्हीएम विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. त्याच संदर्भात ते विरोधकांच्या भेटी घेत आहेत. सोमवारीच राज ठाकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटले होते. आज ते ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी कोलकाता या ठिकाणी गेले आहेत. येत्या काही दिवसात ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचीही भेट घेणार आहेत.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काही दिवसात जाहीर होईल. ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात येणार नसेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू अशी मनसेची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र पुण्यात रविवारी शरद पवार यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत बॅलेट पेपरवर निवडणूक नसेल तर बहिष्कार ही राज ठाकरेंची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचं सांगितलं. दरम्यान राज ठाकरे आघाडी सोबत जाणार की स्वतंत्रपणे लढणार हे अजून स्पष्ट व्हायचं आहे. ईव्हीएम विरोधात विरोधकांची एकी करण्यात राज ठाकरे यशस्वी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी राज ठाकरेंची काय चर्चा होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.