पीटीआय, इस्लामाबाद 

तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षावर कारवाई, मतदान हेराफेरीचे आरोप आणि तुरळक हिंसाचार यामुळे वादग्रस्त झालेल्या निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानानंतर पाकिस्तानमध्ये मतमोजणी सुरू झाली. संशयित दहशतवादी हल्ले अयशस्वी करण्यासाठी सरकारने मोबाइल आणि इंटरनेट सेवा बंद केल्यानंतर संपर्क समस्या निर्माण झाली होती.

maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…

पाकिस्तानात आज सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कोणत्याही विरामाशिवाय सुरू राहिले. १२ कोटींहून अधिक मतदारांना मतदान करता यावे यासाठी देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदान केंद्राच्या आवारात उपस्थित असलेल्या लोकांना मतदान करण्याची मुभा देण्यात आली. मतदानाची टक्केवारी अद्याप कळू शकलेली नाही.

हेही वाचा >>>मोदींचं ४०० जागांचं स्वप्न भंगणार? इंडिया आघाडीला किती जागा मिळणार? वाचा ओपिनिअन पोलचे अंदाज काय सांगतात

देशभरातून मतदान केंद्रांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. परंतु कोणत्याही मतदारसंघाचा संपूर्ण निकाल जाहीरा झालेला नाही.एकूण ३३६ पैकी २६६ नॅशनल असेंब्लीच्या जागांसाठी निवडणूक होती. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला १३३ जागा जिंकणे आवश्यक आहे.