भारती एअरटेल, आयडिय़ा सेल्युलर आणि व्होडाफोन या प्रमुख मोबाईल कंपन्यांनी आपल्या २जी इंटरनेट सेवेच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार २जी इंटरनेट सेवा वापरणा-या ग्राहकांना यापुढे विशिष्ट प्लान्सवर काही मर्यादेपर्यंतच डाऊनलोडची सुविधा उपलब्ध असणार आहे, तसेच या प्लान्सची वैधता आधीपेक्षा कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे १ जीबी डेटा डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट युजर्सना जवळपास २५ टक्के जादा रक्कम मोजावी लागणार आहे.
व्होडाफोन, एअरटेल आणि आयडिया या तीनही कंपन्या बाजारातील जवळपास ५३ टक्के ग्राहकांना मोबाईल सेवा पुरवतात. या कंपन्यांनी इंटरनेट डाऊनलोड आणि वैधता प्लान्समध्ये बदल केल्याचं त्यांच्या संकेतस्थळांवर नमूद करण्याच आलं आहे.
यापूर्वी १ जीबी (किंवा १०२४ एमबी) इंटरनेट युसेजसाठी रूपय़े १२५ मोजावे लागत होते, त्यामध्ये बदल करून आता ५२५ एमबी करण्यात आले आहे.
दिल्लीमध्ये २८ दिवसांसाठी १ जीबी डेटा डाऊनलोड करण्यासाठी भारती एअरटेलसाठी रूपये १५६ आणि आयडिया सेल्युलरसाठी १५४ रूपये मोजावे लागणार आहेत. ही रक्कम पूर्वीपेक्षा २५ टक्के अधिक आहे. तर व्होडाफोन ग्राहकांना ३० दिवसांसाठी रूपये १५५ मोजावे लागणार आहेत.
मुंबईत १ जीबी डाऊनलोडसाठी भारती एअरटेलच्या ग्राहकांना रूपये १५४ आणि आयडिया सेल्यलर ग्राहकांना रूपये १५५ मोजावे लागणार आहेत, ज्याची वैधता ३० दिवस असेल.
वर्षभरापेक्षा कमी कालावधीमध्ये टू जी इंटरनेटच्या दरांमध्ये या कंपन्यांनी ही दुस-यांदा वाढ केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा