पूँछ : जम्मू आणि काश्मीरमधील पूँछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये शनिवारी सकाळपासूनच मोबाईल इंटरनेटवर बंदी घालण्यात आली. दहशतवादी हल्ल्याच्या जवळच शुक्रवारी संध्याकाळी तीन नागरिकांचे मृतदेह आढळल्यामुळे ही उपाययोजना करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सफीर हुसैन, मोहम्मद शौकत आणि शबीर अहमद अशी मृतांची नावे आहेत. ते शुक्रवारी ‘संशयास्पद परिस्थिती’त मृतावस्थेत आढळले. गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंबंधी चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप मृतांचे नातेवाईक आणि राजकीय पक्षांनी केला आहे.  प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे याबद्दल लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून मोबाईल इंटरनेट बंद करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>> भारताजवळ अरबी समुद्रात इस्रायली जहाजावर ड्रोन हल्ला; जहाजावरील २० भारतीय नागरिक सुखरुप

या मुद्दय़ावरून अपनी पार्टी,  नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांनी  निदर्शने केली. तर, जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने मृतांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली.

चौकशीस लष्कराचे सहकार्य जम्मू : तीन नागरिकांच्या संशयास्पद मृत्यूंचा तपास करण्यासाठी संपूर्ण सहाय्य आणि सहकार्य केले जाईल अशी घोषणा लष्करातर्फे शनिवारी करण्यात आली. लष्कराच्या प्रसिद्धी विभागाने ‘एक्स’वर नमूद केले, की ‘२१ डिसेंबरच्या घटनेनंतर या भागात सुरक्षा दलांची शोध मोहीम सुरू आहे. तीन नागरिकांचा मृत्यूची चौकशी सुरू आहे. लष्कर सर्व तपासामध्ये संपूर्ण सहाय्य आणि सहकार्य करेल’.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile internet suspended in poonch and rajouri areas amid massive search operation zws
Show comments