करोनाची लस निर्मिती करणाऱ्या मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बैेसेल यांनी करोनाची साथ कधी संपणार आहे यासंदर्भात आपलं मत मांडलं आहे. स्टीफन यांनी करोना लसीकरणाच्या संदर्भात दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लवकरच करोनाचा प्रादुर्भाव संपुष्टात येणार असल्याचं मत व्यक्त केलंय. स्टीफन यांच्या मते पुढील वर्षभरामध्ये करोनाची साथ पूर्णपणे संपेल. जागतिक मागणीनुसार आज जगभरातील अनेक देशांमध्ये करोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन घेतलं जात आहे. त्यामुळेच लवकरच करोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवता येईल असं स्टीफन म्हणाले आहेत.
परिस्थिती कधीपर्यंत आधीसारखी होणार?
गुरुवारी स्वित्झर्लंडमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मॉडर्नाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करोना साथीच्या पार्श्वभूमीवर भविष्याबद्दल काय वाटतं यासंदर्भात भाष्य केलं. “जगभरामध्ये फारच वेगाने लसींची निर्मिती केली जात आहे. याच वेगाने उत्पादन होत राहिल्यास पुढील वर्षापर्यंत मध्यापर्यंत जगभरातील सर्व लोकांसाठी लस उपलब्ध होईल,” असा विश्वास स्टीफन यांनी व्यक्त केलाय. परिस्थिती कधी करोनापूर्व काळाप्रमाणे होणार या प्रश्नावर उत्तर देताना, “मला अपेक्षा आहे की एका वर्षभरामध्ये परिस्थिती पूर्वीप्रमाणे सामान्य होईल,” असं म्हटलंय.
…तर पुन्हा संसर्गाची भीती
तसेच स्टीफन यांनी लसीकरण करुन घेण्याचं आव्हान केलं आहे. जे लोक लसीकरण करुन घेत आहेत ते भविष्यात या विषाणूमुळे होणाऱ्या धोक्यापासून सुरक्षित राहतील असं स्टीफन म्हणाले आहेत. तसेच जे लोक लस घेणार नाहीत त्यांना डेल्टा व्हेरिएंटमुळे संसर्ग होऊन रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची पुन्हा वेळ येऊ शकते असा इशाराही स्टीफन यांनी दिलाय.
दिलासादायक वृत्त : ‘मॉडर्ना’चे सीईओ म्हणतात, “मला वाटतं वर्षभरामध्ये करोना…”
मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बैेसेल यांनी एका मुलाखतीमध्ये करोनासंदर्भात मोठं भाकित व्यक्त केलं आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-09-2021 at 17:09 IST
TOPICSकरोना लसCorona Vaccineकरोना विषाणूCoronavirusकरोना व्हेरिएंटCorona VariantsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News
+ 1 More
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moderna chief executive stephane bancel sees pandemic over in a year scsg