: NDA Government Nitish Kumar and Chandrababu Naidu Minister Distribution : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा सोहळा आज सायंकाळी पार पडणार आहे. यावेळी त्यांच्याबरोबर ३० नवनिर्वाचित खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची शक्यता आहे. या सत्तास्थापनेसाठी जनता दल (यु) आणि तेलगु देसम पक्ष या दोन पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जनता दलाचे नितीश कुमार आणि तेलुगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनी महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कोणती खाती जातील हे पाहावं लागणार आहे.

तेलुगु देसम आणि जनता दल युनायटेडमुळे ‘एनडीए’ बहुमतापर्यंत पोहोचला. तेलुगु देसमने लोकसभाध्यक्ष पदासह माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाची तर जनता दलाने रेल्वे मंत्रालयाची मागणी केल्याचे समजते. कृषि मंत्रालयावर दोन्ही जनता दलांनी दावा केला आहे. भाजपवर घटक पक्षांनी दबाव वाढवला असला तरी, विविध क्षेत्रांतील पायाभूत विकासांची मंत्रालये सोडण्याची भाजपची तयारी नाही. त्यामुळे खातेवाटपाची गुंतागुंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गृह, अर्थ, संरक्षण व परराष्ट्र संबंध ही चार अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवण्यावर भाजप ठाम असून लोकसभाध्यक्षपदबाबतही तडजोड केली जाणार नसल्याचे समजते. तेलुगु देसमला लोकसभेचे उपाध्यक्षपद दिले जाऊ शकते.

Maharashtra Assembly Election 2024
Mahayuti Politics : पक्ष शिंदे अन् अजित पवारांचे, उमेदवार मात्र भाजपाचे! फडणवीसांच्या ‘या’ पाच शिलेदारांकडून समन्वयाचं राजकारण
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
vidhan sabha election 2024 osmanabad assembly constituency rebel in mp omraje nimbalkar house
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घरातूनच बंडखोरी?
Hasan Mushrif
Hasan Mushrif : “सत्ता आल्यास मी उपमुख्यमंत्री होणार”, मुश्रीफांचा दावा; अजित पवारांचा पत्ता कट? मुख्यमंत्रिपदाबद्दल मोठं वक्तव्य
Maharashtra Assembly Elections 2024 Mahayuti
Maharashtra Assembly Elections 2024 : दलित मविआकडे गेल्यामुळे भाजपाचा नवा प्लॅन, अनुसूचित जातींमधील छोट्या जातींवर लक्ष, महायुतीच्या गोटात काय शिजतंय?
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Big Leader Defeat in Marathi
Maharashtra Assembly Election 2019 : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘या’ तत्कालीन मंत्र्यांचा झाला होता पराभव; कशा झाल्या होत्या लढती?
Ajit Pawar NCP
Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एका तासात चार मोठे पक्षप्रवेश अन् उमेदवाऱ्याही जाहीर; ‘मविआ’तील तिन्ही पक्षांना अप्रत्यक्ष इशारा?
Sameer Bhujbal Resigns from Ajit Pawar NCP
Sameer Bhujbal : छगन भुजबळांच्या घरात बंडखोरी, समीर भुजबळांनी निवडला वेगळा रस्ता!

हेही वाचा >> भाजपला तारणारे ‘एनडीए’तील दोन बाबू

दरम्यान, जनता दलाने (सं) रेल्वे तर, तेलुगु देसमने माहिती-तंत्रज्ञान, रस्तेविकास या खात्यांची मागणी केली असली तरी या खात्यांची राज्यमंत्रिपदे त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे. तसंच, श्रीकाकुलाचे तीन वेळा खासदार राहिलेले किंजरापू राम मोहन नायडू (३६) कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील आणि प्रथमच खासदार डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी (४८) राज्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे. तर, दुसऱ्यांदा जेडीयूचे राज्यसभा खासदार रामनाथ कुमार हे जेडीयूकडून केंद्रीय मंत्री बनण्याच्या तयारीत आहेत. रामनाथ ठाकूर हे समाजवादी दिग्गज आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचे पुत्र आहेत, ज्यांना नुकतेच मरणोत्तर भारतरत्न देण्यात आले.

जनता दल व तेलुगु देसम या दोन्ही प्रमुख घटक पक्षांना अनुक्रमे किमान २ आणि ४ केंद्रीय मंत्रिपदे दिली जाऊ शकतील. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, जनता दल (ध), राष्ट्रीय लोकदल, लोकजनशक्ती पक्ष, अपना दल, हिंदुस्तान अवामी मोर्चा, जनसेना, रिपब्लिकन पक्ष या घटक पक्षांनाही स्थान दिले जाईल. यापैकी अनेक पक्षांनी किमान दोन मंत्रिपदाची मागणी केली असली तरी, मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येकी एक मंत्रिपद दिले जाईल असे समजते. दरम्यान, शपथविधीचे काँग्रेस नेत्यांना अद्याप आमंत्रण मिळाले नसल्याचे पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >> आज रालोआचा शपथविधी; मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात ३० जणांच्या समावेशाची शक्यता

कोणत्या घटकपक्षाचा होणार विचार?

महाराष्ट्रातून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, पवार गटाचे प्रफुल पटेल यांना मंत्री केले जाऊ शकते. भाजपमधून नारायण राणे  उदयनराजे भोसले व रिपब्लिकन पक्षातून रामदास आठवले यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.

घटक पक्षांच्या खात्यांच्या मागण्या

● तेलगु देसम : लोकसभाध्यक्ष, रस्तेविकास, पंचायत राज, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान व शिक्षण

● संयुक्त जनता दल : कृषि, रेल्वे, पंचायत राज, ग्रामीण विकास

● जनता दल (धर्मनिरपेक्ष) : कृषि, पंचायत राज, नागरी पुरवठा, ग्रामीण विकास

● शिवसेना शिंदे : अवजड उद्याोग

महाराष्ट्रातून कोणाला मिळणार संधी?

महाराष्ट्रातून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, पवार गटाचे प्रफुल पटेल यांना मंत्री केले जाऊ शकते. भाजपमधून नारायण राणे व उदयनराजे भोसले व रिपब्लिकन पक्षातून रामदास आठवले यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.