नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका करणे सुरू केल्यामुळेच त्यांना तशाच भाषेत उत्तर देण्यासाठी आपण चहा विक्रेत्यासंबंधीची टीका त्यांच्यावर केली, असे प्रतिपादन काँग्रेसचे खासदार मणिशंकर अय्यर यांनी सोमवारी येथे केले.
मोदी यांनी आमच्या नेत्यांवर अत्यंत असभ्य भाषेत वैयक्तिक स्वरूपाची टीकाटिप्पणी केली. त्यामुळे आपले ‘ते’ वक्तव्य जशास तशा उत्तरापेक्षा काही वेगळे नव्हते, असा दावा अय्यर यांनी केला. २१ व्या शतकात नरेंद्र मोदी कदापिही पंतप्रधान होऊ शकणार नाहीत. त्यांना चहाविक्री करायची असेल तर आम्ही चांगली जागा शोधून देऊ, असे वक्तव्य अय्यर यांनी काँग्रेस समितीच्या बैठकीत केले होते. अय्यर यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले होते.
‘चहावाला’ दिग्विजय यांना अमान्य
काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांनी मोदींना ‘चहावाला’ म्हणून हिणवणे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांना अजिबात रुचलेले नाही़  कोणावरही अशा प्रकारची शेरेबाजी करणे योग्य नाही, असे स्पष्ट मत सिंह यांनी सोमवारी व्यक्त केल़े  दिग्विजय म्हणाले की, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या व्यक्ती देशाच्या राष्ट्रपतीही झाल्या आहेत़  भारतात प्रत्येक सामान्य माणूस देशात उच्च पदावर विराजमान होण्याची मनीषा बाळगू शकतो, असेही सिंह म्हणाल़े

Story img Loader