केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू झाल्यापासून दिल्लीकडे सगळ्यांकडे लक्ष लागलं होतं. विशेषतः महाराष्ट्रातून नारायण राणे यांच्यासह काही जणांची नावे चर्चेत होती. मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी वेगवान घडामोडी सुरू होत्या. शपथविधीची वेळ जवळ येत असतानाच कुणाला मंत्रिमंडळात घेणार याविषयी राजकीय वर्तुळात धाकधूक वाढली होती. मात्र, अखेर यावरील पडदा दूर झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेणाऱ्या ४३ मंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, यात नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातील चार जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली होती. यात नारायण राणे यांचं नाव आघाडीवर होतं. त्याचबरोबर हिना गावित, भागवत कराड, भारती पवार, कपिल पाटील, प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना दिल्लीत बोलावून घेण्यात आलं होतं. मात्र, सकाळपासून केवळ वेगवेगळे तर्कविर्तक लावले जात होते. त्यामुळे कुणाचा मंत्रिमंडळात समावेश होणार याविषयीची संदिग्धता कायम होती. सरकारकडून यादी जाहीर करण्यात आली असून, सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील आणि भारती पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा- Modi Cabinet Expansion : देशाला मिळणार नवीन आरोग्यमंत्री; हर्ष वर्धन यांचा राजीनामा
मोदींच्या मंत्रिमंडळात यांची लागली वर्णी… (महाराष्ट्रातील नावं ठळक अक्षरात)
नारायण राणे
सर्बानंद सोनोवाल
डॉ. विरेंद्र कुमार
ज्योतिरादित्य सिंधिया
रामचंद्र प्रसाद सिंग
अश्विनी वैष्णव
पशुपती कुमार पारस
किरेन रिजीजू
राजकुमार सिंह
हरदीप सिंह पुरी
मनसुख मंडाविया
भुपेन्द्र यादव
पुरुषोत्तम रुपाला
जी. किशन रेड्डी
अनुराग सिंह ठाकूर
अनुप्रिया सिंह पटेल
डॉ. सत्यपाल सिंह बघेल
राजीव चंद्रशेखर
शोभा करंडलाजे
भानूप्रताप सिंग वर्मा
दर्शना विक्रम जरदोष
मीनाक्षी लेखी
अनपुर्णा देवी
ए. नारायण स्वामी
कौशल किशोर
अजय भट्ट
बी. एल. वर्मा
अजय कुमार
चौहाण देवूसिंह
भागवत खुपा
कपिल पाटील
प्रतिमा भौमिक
डॉ. सुभाष सरकार
डॉ. भागवत कराड
डॉ. राजकुमार सिंह
डॉ. भारती पवार
बिस्वेश्वर तडू
शंतनु ठाकूर
डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
जॉन बरला
डॉ. एल. मुरगन
निसित प्रमाणिक
43 leaders to take oath today in the Union Cabinet expansion. Jyotiraditya Scindia, Pashupati Kumar Paras, Bhupender Yadav, Anupriya Patel, Shobha Karandlaje, Meenakshi Lekhi, Ajay Bhatt, Anurag Thakur to also take the oath. pic.twitter.com/pprtmDu4ko
— ANI (@ANI) July 7, 2021
नारायण राणे यांना मिळणार शिवसेनेच्या मंत्र्यांनी सांभाळलेलं खातं
नारायण राणे यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपद दिलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी हे मंत्रीपद शिवसेनेकडे होतं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आल्यापासून शिवसेनेला हे मंत्रिपद देण्यात आलं होतं. मोदी यांच्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांनी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपदाचं काम बघितलं. त्यानंतर दुसऱ्या कार्यकाळात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योगमंत्री पद सोपवण्यात आलं होतं. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्यानंतर अरविंद सावंत यांनी या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर प्रकाश जावडेकर यांच्याकडे या खात्याचा पदभार देण्यात आलेला आहे. आता नारायण राणे यांच्याकडे अवजड उद्योग खात्याची सूत्रं दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेबरोबरच भाजपाने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे.