अमित शहांकडे सहकार; मंडाविया आरोग्य, तर प्रधान नवे शिक्षणमंत्री

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात बुधवारी ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात, ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असून, १५ कॅबिनेट मंत्री, तर २८ राज्यमंत्री आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिले सहकारमंत्रीपद अमित शहा यांच्याकडे देण्यात आले असून, त्यांच्याकडील गृहमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे.  गुजरातचे मनसुख मंडाविया हे नवे आरोग्यमंत्री असतील तर, माजी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान नवे शिक्षण मंत्री असतील.

नव्या रचनेत मोदींच्या मंत्रिमंडळात आता ७७ मंत्री आहेत. त्यातील ७३ भाजप व उर्वरित ४ मंत्री अपना दल, जनता दल (सं), लोक जनशक्ती व रिपब्लिकन पक्ष या घटक पक्षांचे आहेत. मोदींचे नवे मंत्रिमंडळ पूर्वीच्या तुलनेत अधिक तरुण असून महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, जाट, मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेशला सर्वाधिक ७ तर, महाराष्ट्राला ४ नवी मंत्रिपदे देण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात २५ राज्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे.

yogi adityanath criticize congress and mahavikas aghadi
योगी आदित्यनाथ म्हणाले “काँग्रेस नेतृत्वातील ‘मविआ’ची नियत साफ नाही”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
devendra fadnavis remark on vote jihad in mumbai
‘व्होट जिहाद’विरोधात ‘मतांचे धर्मयुद्ध’ पुकारावे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
uddhav thackeray shiv sena leader ex mla rupesh mhatre join eknath shinde shiv sena
ठाकरे गटाचा माजी आमदार शिंदे गटात; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
Congress response to Fadnavis criticism of the Prime Minister print politics news
‘पंतप्रधानांना बदलायचे आहे हे तेच संविधान’; फडणवीस यांच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

सहा केंद्रीय मंत्र्यांसह १२ मंत्र्यांना वगळण्यात आले असले तरी, संरक्षण, गृह, अर्थ व परराष्ट्र खात्यांच्या प्रमुख चार मंत्र्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आरोग्य, शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, माहिती-प्रसारण, विधि, सामाजिक न्याय, रसायने व खते, नागरी पुरवठा, अवजड उद्योग, दूरसंचार, पर्यावरण, कामगार कल्याण अशा किमान १२ मंत्रालयांसाठी नवे केंद्रीय तसेच, राज्यमंत्री नियुक्त केले जातील.

ज्योतिरादित्य, सोनोवाल, भूपेंद्र यादव मंत्रिमंडळात

राष्ट्रपती भवनात बुधवारी संध्याकाळी सहा वाजता शपथविधी पार पडला. खातेवाटप जाहीर करण्यात आलेले नाही. मंत्रिपदासाठी एक वर्ष ताटकळणारे ज्योतिरादित्य शिंदे, आसामाचे मुख्यमंत्रीपद हिमंत बिस्व-सरमा यांच्याकडे सोपवून दिल्लीत येणारे सर्वानंद सोनोवाल, मोदी-शहा यांचे विश्वासू भूपेंद्र यादव, उद्योजक व भाजपचे राज्यसभेतील खासदार राजीव चंद्रशेखर यांना स्थान देण्यात आले आहे. अनुप्रिया पटेल यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. चिराग पासवान यांचे काका व लोक जनशक्तीच्या बंडखोर गटाचे प्रमुख पशुपती पारस तसेच, नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाचे रामचंद्र प्रताप सिंह यांनाही मंत्रिमंडळात घेण्यात आले असून जनता दल पहिल्यांदाच मोदी सरकारमध्ये सामील झाला आहे. दिल्लीतून मीनाक्षी लेखींनाही संधी देण्यात आली आहे.

राणेंकडे लघुउद्योग, भारती पवार आरोग्य राज्यमंत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना स्थान मिळाले असून, या चार मंत्र्यांमुळे राज्याला मिळालेल्या मंत्रिपदांची संख्या आठ झाली आहे. नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली असून हे मंत्रालय यापूर्वी नितीन गडकरी यांच्याकडे होते. डॉ. भारती पवार यांना अत्यंत महत्त्वाच्या आरोग्य मंत्रालयातील राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भागवत कराड अर्थराज्यमंत्री असतील. कपिल पाटील नवे पंचायत राज राज्यमंत्री असतील. रामदास आठवले यांच्याकडील सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद कायम ठेवण्यात आले आहे. राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना नागरी पुरवठा मंत्रालयातून रेल्वे, कोळसा व खाण मंत्रालयात पाठवण्यात आले आहे.

नवे कॅबिनेट मंत्री : नारायण राणे (महाराष्ट्र), सर्वानंद सोनोवाल (आसाम), डॉ. वीरेंद्र कुमार (मध्य प्रदेश), ज्योतिरादित्य शिंदे (मध्य प्रदेश), अश्विनी वैष्णव (ओडिशा), भूपेंद्र यादव (राजस्थान), रामचंद्र प्रताप सिंह (जनता दल-संयुक्त-बिहार), पशुपती पारस (लोक जनशक्ती-बिहार)

यांची खाती कायम..

अमित शहा- गृहमंत्री, राजनाथ सिंह- संरक्षण, नितीन गडकरी- रस्ते व राष्ट्रीय महामार्ग, निर्मला सीतारामन- अर्थ, नरेंद्र तोमर- कृषि, एस. जयशंकर- परराष्ट्र, प्रल्हाद जोशी- संसदीय कामकाज, कोळसा व खनिज, मुख्तार अब्बास-अल्पसंख्याक, गजेंद्र सिंह शेखावत- जलशक्ती, अर्जुन मुंडा- आदिवासी कल्याण आदी मंत्र्यांची खाती कायम ठेवण्यात आली आहेत.

नवे २८ राज्यमंत्री

पंकज चौधरी , सत्यपाल सिंह बघेल (उत्तर प्रदेश), राजीव चंद्रशेखर (कर्नाटक), शोभा करंदळजे (कर्नाटक), भानू प्रताप सिंह वर्मा (उत्तर प्रदेश), दर्शना जरदोश (गुजरात), मीनाक्षी लेखी (दिल्ली), अन्नपूर्ण देवी (झारखंड), ए. नारायण स्वामी (कर्नाटक), कौशल किशोर (उत्तर प्रदेश), अजय भट (उत्तराखंड), बी. एल. वर्मा (उत्तर प्रदेश), अजय कुमार (उत्तर प्रदेश), देवसिंह चौहान (गुजरात), भगवंत खुबा (कर्नाटक), कपिल पाटील, भागवत कराड , भारती पवार (महाराष्ट्र), प्रतिमा भौमिक (त्रिपुरा), सुभाष सरकार (पश्चिम बंगाल), राजकुमार रंजन सिंह (मणिपूर), बिश्वेश्वर टुडू (ओडिशा), शंतनू ठाकूर (पश्चिम बंगाल),  मुंजपारा महेंद्रभाई (गुजरात), जॉन बर्ला (पश्चिम बंगाल), डॉ. एल. मुरुगन (तमिळनाडू), निषिथ प्रामाणिक (पश्चिम बंगाल) (सर्व भाजप) व अनुप्रिया पटेल (अपना दल-उत्तर प्रदेश).