भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काश्मीरमध्ये येण्याची हिम्मत नसल्याचे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दु्ल्ला यांनी केले आहे.
ओमर अब्दुल्ला आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हणतात की, “नरेंद्र मोदी एकवेळ जम्मू आणि श्रीनगरमध्ये लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मते झोळीत पाडण्यासाठी मतदारांना साद घालण्यासाठी येतील परंतु, काश्मीरमध्ये येण्याची हिम्मत त्यांच्यात नाही. याआधी मी मोदींना कलम ३७० वर जाहीर चर्चा करण्याचे आवाहन केले होते. परंतु, मोदींनी त्याला बगल दिली.” तसेच भाजप सत्तेत असताना काश्मीर पंडीत समाज काश्मीर सोडून निघून गेला होता. काश्मीरमधील मुस्लिमांची पंडीत समाज काश्मीरमध्ये परत यावा अशी इच्छा आहे. असेही ओमर अब्दुल्ला म्हणाले आहेत.

 

 

Story img Loader