चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल नक्कीच कॉंग्रेसविरोधी आहेत. मात्र, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने हुरळून जाण्याचे काहीच कारण नाही, असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सोमवारी व्यक्त केले.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थान आणि दिल्लीमध्ये कॉंग्रेसला सत्तेवरूनही पायउतार व्हावे लागले. त्या पार्श्वभूमीवर नितीशकुमार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण केले.
ते म्हणाले, चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल कॉंग्रेसविरोधी आहेत, यामध्ये कोणतीच शंका नाही. मात्र, यावरून भाजपने हुरळून जाण्याचे काहीच कारण नाही. भाजपच्या बाजूने देशात कोणतीच लाट नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी खालावेल, हेच या निकालांवरून दिसते.
नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करून भाजपने जी खेळी खेळली होती. ती पूर्णपणे फसली असल्याचे दिल्ली विधानसभेच्या निकालांवरून दिसते, अशीही टीका नितीशकुमार यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा