रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबवण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले. भारतही त्यापैकी एक देश आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी भारताचं नोबेल पुरस्कार समितीने कौतुक केलं आहे. नोबेल समितीचे उपनेते अस्ले तोजे म्हणाले की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लॅदिमीर पुतीन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मोदी यांनी कोणतीही धमकी न देता युद्धाच्या परिणामांबद्दल कडक संदेश दिला. आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा नेत्यांची खूप आवश्यकता आहे.”
रशिया-युक्रेन युद्धावेळी मोदींनी घेतलेल्या भूमिकेचं अस्ले तोजे यांनी कौतुक केलं. ते म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा प्रकारच्या हस्तक्षेपांची गरज आहे. तोजे म्हणाले, “अण्वस्त्रे वापरण्याच्या परिणामांची रशियाला आठवण करून देण्यासाठी भारताचा हस्तक्षेप खूप उपयुक्त होता. मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सांगितलं की, हे युद्धांचं युग नाही.”
हे ही वाचा >> “विरोधकांना बोलायला जागाच ठेवली नाही”; उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर
तोजे म्हणाले की, “भारताने मोठा गाजावाजा केला नाही, तसेच कोणालाही धमकावलं नाही. भारताने केवळ मैत्रीपूर्ण रीतीने आपली भूमिका जाहीर केली. जागतिक राजकारणात आपल्याला याची आवश्यकता आहे.”