मोदी सरकारने देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. एकूण १७ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने आज (बुधवार) हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने २०२२-२३ पीक वर्षासाठी पिकांचा एमएसपी १०० रुपयांनी वाढवून २,०४० रुपये प्रति क्विंटल केला आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक खरीप पिकांवरही एमएसपी वाढवण्यात आला आहे.
तीळावर ५२३ रुपयांची वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “पेरणीच्या वेळी एमएसपीची माहिती घेतल्याने शेतकऱ्यांचे मनोबलही उंचावते आणि त्यांना पिकाला चांगला भाव मिळतो. यावेळी सर्व १४ खरीप पिके आणि त्यांच्या वाणांसह १७ पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आली आहे.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत.”
तसेच म्हणाले की, “आजच्या बैठकीत खरीप पिकांसाठी एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी जसे ठरवण्यात आले होते की, खर्च अधिक ५० टक्के तो निर्णय आम्ही सातत्याने पुढे नेला आहे. किसान सन्मान निधी अंतर्गत दोन लाख कोटी रुपये खात्यात गेले आहेत. खतावर दोन लाख दहा हजार कोटींचे अनुदान देण्यात आले आहे.”
याचबरोबर, “कृषी अर्थसंकल्प देखील १ लाख २६ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. आमच्या सरकारने इतरही अनेक पिकांना एमएसपीच्या कक्षेत आणले आहे. विम्यापासून सिंचनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सक्षमीकरण झाले आहे. कृषी क्षेत्रात अनेक पावले उचलली गेली आहेत. पीक विविधतेला प्रोत्साहन देताना सरकारने एमएसपीच्या दरात ऐतिहासिक वाढ केली, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आणि त्यांची विक्रीही वाढली. गेल्या आठ वर्षांत मोदी सरकारच्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. यासोबतच शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.” असंही अननुराग ठाकूर म्हणाले आहेत.