मोदी सरकारने तब्बल ४५ हजार कोटींचा टेलिकॉम घोटाळा दडवून ठेवला असल्याचा आरोप गुरूवारी काँग्रेसकडून करण्यात आला. या घोटाळ्यामागे नरेंद्र मोदी यांच्या उद्योजक मित्रांना फायदा मिळवून देण्याचा उद्देश असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला. पारदर्शक कारभाराची भाषा करणाऱ्या मोदी सरकारकडून या महाघोटाळ्यावर पांघरूण घालण्यात आले आहे. मोदी अनेकदा ना खाऊंगा ना खाने दुंगा असे सांगतात. मात्र, यानिमित्ताने त्यांचे आणखी एक आश्वासन खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. मोदी सरकारने सहा टेलिकॉम कंपन्यांना दंड न आकारून मदत केली आहे. सरकार त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, असे सुरजेवाला यांनी सांगितले.