भारत-म्यानमान सीमेवर तब्बल १६४३ किमी लांबीचे कुंपण घालण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भातील माहिती दिली. देशाच्या सरक्षेच्या दृष्टीने हे मोठे पाऊल मानले जात आहे. म्यानमारमधून लोक अवैधरित्या प्रवेश करत होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, मोदी सरकार सुरक्षित सीमा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहेत. या संदर्भात भारत-म्यानमारच्या १६४३ किमी लांबीच्या सीमेला कुंपण घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय गस्तीसाठी स्वतंत्र ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. मणिपूरमधील मोरेहपासून १० किमी लांबीचे कुंपण पूर्ण झाले आहे. याशिवाय हायब्रीड सर्व्हिलन्स सिस्टिमद्वारे कुंपण घालण्याच्या इतर दोन पथदर्शी प्रकल्पांवर काम केले जात आहे. त्यांच्या बाजूने अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरमध्येही दहा किलोमीटरचे कुंपण बांधले जाणार आहे. याव्यतिरिक्त, मणिपूरमध्ये सुमारे २० किमीच्या कुंपणाच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे आणि लवकरच काम सुरू होईल.
हा निर्णय घेण्यामागे अनेक कारणे आहेत. मानवी तस्करी, अंमली पदार्थाचा व्यापार, बेकायदेशीर स्थलांतर या काही समस्या आहेत. ज्यांनी गेल्या काही वर्षांत भारत सरकारसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या सर्व बेकायदा कृत्यांना कुंपण घालण्याचा सरकारचा हेतू आहे.