गुजरातमधील नरेंद्र मोदी यांचे सरकार दुतोंडी असल्याची घणाघाती टीका केंद्रीय कायदेमंत्री कपिल सिब्बल यांनी मंगळवारी केली. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी भाजप गुजरातमध्ये वेगळे बोलतो आणि केंद्र सरकारकडून वेगळीच अपेक्षा ठेवतो, असा आरोपही सिब्बल यांनी भाजपवर केला. 
ते म्हणाले, गुजरातमधील मोदी यांचे सरकार तेथील लोकायुक्त स्वतःच्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच ते दुतोंडीपणाने वागता आहेत. केंद्र सरकारकडून भाजप ज्या अपेक्षा ठेवतो आहे. त्याच्या पूर्णपणेविरुद्ध ते गुजरातमध्ये वागत आहेत. यावरूनच ते दुतोंडी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुजरात विधानसभेमध्ये नुकतेच सुधारित लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामध्ये लोकायुक्ताची नियुक्ती करण्यात मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे वर्चस्व कायम ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सिब्बल यांनी भाजपवर टीका केली.

Story img Loader