संभलपूर (ओडिशा) : देशातील असहाय्य नागरिकांना मोदी हमी ही अखेरची आशा आहे. ओडिशाच्या सर्वांगिण विकासाठी भाजप वचनबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी येथील कार्यक्रमाद्वारे राज्यात पक्षासाठी वातावरण निर्मिती केली.

राज्यात २०१९ नंतर ही पहिलीच पंतप्रधानांची राजकीय सभा होती. यामध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली. मतपेढी म्हणून काँग्रेसने जनतेचा वापर केला. तर भाजपने अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासाला प्राधान्य दिले. विकासकामांसाठी ही तरतूद गेल्या दहा वर्षांत सरकारने वाढवल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?

हेही वाचा >>> झारखंडमध्ये जनादेश डावलण्याचा भाजपचा प्रयत्न; राहुल गांधी यांचा आरोप

या सभेपूर्वी पंतप्रधानांनी शनिवारी ओडिशामध्ये ६८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. आयआयएम, संभलपूरच्या  कॅम्पसचे उद्घाटन करण्याव्यतिरिक्त, त्यांनी राज्यातील ऊर्जा, रस्ते आणि रेल्वे यासारख्या विविध क्षेत्रातील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे अनावरण केले.  पंतप्रधानांनी २०२१ मध्ये त्यांनी आयआयएम कॅम्पसची पायाभरणी केली होती. राज्यातील १८ प्रकल्पांचे अनावरण केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले, ‘‘या प्रकल्पांमुळे ओडिशातील तरुणांना फायदा होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. केंद्र सरकार ओडिशाला प्रत्येक क्षेत्रात मदत करत आहे.’’  देशातून विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतील. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेतही सुधारणा होईल आणि संभलपूर हे शिक्षणाचे केंद्र बनेल,’’ मोदी म्हणाले.

Story img Loader