पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशामध्ये १५५० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या केंद्र सरकारच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. सदर प्रकल्प राज्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, असे या वेळी मोदी म्हणाले.

ओदिशातील संपर्कतेचा विस्तार करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असल्याचे स्पष्ट करून मोदी म्हणाले की, शिक्षण आणि संपर्कता यामुळे समाजाच्या सर्व स्तरांचा वेगाने विकास होईल.

शिक्षण, संपर्कता, पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील १५५० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना आपल्याला आनंद होत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

ओदिशा राज्यास तिसऱ्यांदा भेट देत असताना मोदी यांनी झारसुगुडा-विजयानगरम आणि संबलपूर-अंगूल या ८१३ कि.मी.च्या आणि १०८५ कोटी खर्चाचा रेल्वेमार्ग विद्युतीकरण देशाला समर्पित केला.

त्याचप्रमाणे मोदी यांच्या हस्ते बारपाली-डुंगरीपाली या १४.२ कि.मी. आणि बालनगीर-देवगाव या १७.३ कि.मी.च्या दुपदरीकरणाचेही उद्घाटन करण्यात आले. संपर्कतेमुळे व्यापार, पर्यटनला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांनाही कृषीमाल मंडयांपर्यंत नेणे शक्य होईल, असे मोदी म्हणाले.

Story img Loader