भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या रविवार झालेल्या बैठकीत आक्रमक भाषण करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस आणि संयुक्त जनता दलाने कडवट टीका केली आहे. नरेंद्र मोदी हे विषारी चहाचे विक्रेते असून ते देशाचे पंतप्रधान होता कामा नये, अशी टीका जेडीयूने केली आहे.
संपूर्ण गुजरातमध्ये विषारी चहा पसरवणारे मोदींचे आता देश लक्ष आहे. त्यामुळे अशी व्यक्ती देशाचा पंतप्रधान होता कामा नये, अशी टीका जेडीयूचे नेते के. सी. त्यागी यांनी केली.
रविवारी येथील रामलीला मैदानावर झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केल्यानंतर  जेडीयूपाठोपाठ काँग्रेसनेही मोदींवर हल्ला केला आहे. भाजप केवळ पंतप्रधानपदाचा उमेदवारच देऊ शकते. मात्र काँग्रेस देशाला सशक्त पंतप्रधान देईल, अशी टीका केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी केली. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार दिले तर काँग्रेस आणि यूपीए सरकारनेच पंतप्रधान दिल्याचेही मनीष तिवारी यांनी लुधियाना येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आगामी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसलाच जनमत मिळणार आहे. त्यामुळे जनतेने काँग्रेस आणि यूपीएला कौल दिल्यावर  सक्षम पंतप्रधान देऊ, असा विश्वासही
मनीष तिवारी यांनी या वेळी बोलून दाखवला.

Story img Loader