काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान, ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला आला आहे. राहुल गांधीनीही घोषणा देणाऱ्यांना हटके प्रत्युत्तर दिलंय. राहुल गांधींच्या उत्तराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या घटनेचा हा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
हेही वाचा – Gujarat Election 2022 : गुजरातच्या जुहापुरातील मुस्लीम समुदाय अद्यापही शिक्षणापासून वंचित
राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा रविवारी सायंकाळी मध्यप्रदेशमधून राजस्थानमध्ये दाखल झाली. तत्पूर्वी, ही यात्रा मध्यप्रेदशच्या अगर मालवा या भागातून जात असताना भाजपा समर्थकांकडून पंतप्रधान मोदींच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणा देत राहुल गांधी यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हेही वाचा – प्रजासत्ताकदिनापासून काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान!; रायपूरला फेब्रुवारीत पक्षाचे ८५ वे अधिवेशन
दरम्यान, राहुल गांधी यांनीही ‘फाईंल किस’ देत भाजपा समर्थकांना प्रत्युत्तर दिलं. राहुल गांधीच्या कृतीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अनेकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
भारत जोडो यात्रा रविवारी सांयकाळी राजस्थानच्या जलवार जिल्ह्यात दाखल झाली. ही यात्रा २१ डिसेंबरपर्यंत राजस्थानमध्ये आहे. यादरम्यान ९ आणि १७ डिसेंबर असे दोन दिवस ही यात्रा स्थगीत करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारत जोडो यात्रा या ज्या मार्गावरून जाणार आहे. त्यापैकी काँग्रेसची सत्ता असलेलं राजस्थान हे शेवटचं राज्य आहे. त्यामुळे ही यात्रा यशस्वी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.