मकर संक्रांतीच्या उत्सवासाठी गुजरातमधील बाजारपेठा पतंगांनी सजल्या असून या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रतिमा असलेल्या पतंगांचे बाजारपेठेवर वर्चस्व असल्याचे चित्र दिसत आहे.
बडोदा, सुरत, भडोच, राजकोट, अहमदाबाद आणि अन्य ठिकाणी मोदी आणि ओबामा यांच्या प्रतिमा असलेले पतंग मोठय़ा प्रमाणावर आले आहेत, असे बडोदा पंतग विक्रेते आणि मालक संघटनेचे सचिव मेहमूद खुभानभाई पतंगवाला यांनी सांगितले.
बाजारपेठेत विविध आकारांचे, रंगांचे, नानाविध प्रतिमा असलेले पतंग मोठय़ा प्रमाणावर आले असले तरी मोदी आणि ओबामा यांच्या प्रतिमा असलेल्या पतंगांना मोठी मागणी आहे. ओबामा यांनी नरेंद्र मोदी यांचे गेल्या वर्षी अमेरिकेत गुजराती भाषेत स्वागत केल्यानंतर या दोन्ही नेत्यांची प्रतिमा असलेल्या पतंगांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
त्यानंतर ‘व्हायब्रण्ट गुजरात’ गुजरात परिषदेत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी मोदी यांना ज्या उत्साहाने आलिंगन दिले त्यामुळेही मोदी-ओबामा पतंगांच्या मागणीत वाढ झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा