मोदींचा पत्रकारांसमवेत दिवाळी मीलन कार्यक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय सण हे समाजाला भेदभाव न करता समानता रुजवण्याचा संदेश देतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात पत्रकारांशी संपर्क साधण्यासाठी आयोजित दिवाळी मीलन कार्यक्रमात सांगितले.
दिवाळीसारखे भारतीय सण, कुंभमेळ्यासारखे कार्यक्रम समाजाला समानतेच्या मूल्यांची प्रेरणा देतात असे सांगून ते म्हणाले की, आपल्या समाजात सणांची अशी वेगळी शक्तिस्थाने आहेत ती नवी ऊर्जा व उत्साह देत असतात. या सणांचा सामाजिक व आर्थिक पैलू विचारात घेतला तर त्यातून अनेक बातम्या देता येतील. कुंभमेळ्याला गंगेच्या किनाऱ्यावर जे लोक जमतात त्यांची संख्या एखाद्या छोटय़ा युरोपीय देशातील लोकांइतकी असते.
अनौपचारिक गप्पांच्या वेळी पत्रकारांनी त्यांना गराडाच घातला. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त राज्यघटनेची सर्वोच्चता आम्ही संसदेत चर्चा घेऊन अधोरेखित केली. देशातील तळागाळातील व्यक्तीलासुद्धा त्याच्या घटनात्मक अधिकारांची जाणीव असली पाहिजे यासाठी आम्ही वर्षभर सर्व पक्ष व माध्यमांतून प्रयत्न करणार
आहोत.
या वेळी अर्थमंत्री अरुण जेटली, संसदीय कामकाजमंत्री एम. व्यंकय्या नायडू, वाहतूकमंत्री नितीन गडकरी, दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद व मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, भाजप नेते रामलाल, कैलाश विजयवर्गीय, अरूण सिंह, भूपिंदर यादव, सरोज पांडे आदी उपस्थित होते.