अमेरिकेतील भारताच्या उपमहावाणिज्य दूत देवयानी खोब्रागडे यांची पोलीस ठाण्यात कपडे उतरवून चौकशी करण्यात आल्याने भारत दौऱयावर आलेल्या अमेरिकेच्या शिष्टमंडळाची भेट घेण्यास काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नकार दिला आहे
खोब्रागडे प्रकरणाचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम नको
घरातील मोलकरणीचा व्हिसा मिळवून घेताना चुकीची माहिती दिल्याबद्दल तसेच या मोलकरणीला अत्यल्प वेतन दिल्याच्या आरोपावरून न्यूयॉर्कमध्ये खोब्रागडे यांना सार्वजनिक ठिकाणी अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी त्यांची कपडे उतरवून चौकशी करण्यात आली. खोब्रागडे यांना जामिनावर सोडण्यात आले असले तरी दूतावासाच्या अधिकाऱ्याला अशा प्रकारे अटक करण्यात आल्याबद्दल भारताने अमेरिकेकडे नाराजी व्यक्त केली आहे.
मोलकरणीला ‘राबवणे’ भोवले!
आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी तसेच घरातील कामे करण्यासाठी देवयानी खोब्रागडे यांनी भारतातून संगीता रिचर्ड हिला अमेरिकेत नेले होते. त्या वेळी त्यांनी सादर केलेल्या व्हिसा अर्जात दिलेल्या तपशिलाप्रमाणे संगीता हिला वेतन न दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अधिकाऱ्यास सार्वजनिक ठिकाणी अटक करणे हा अपमानच -खुर्शीद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा