आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या आव्हानाला सामोरे जाताना पक्षातील जुन्या नेत्यांना जबाबदारीतून मुक्त करीत  नव्या व तरुण चेहऱ्यांना संधी देणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीची रविवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी घोषणा केली. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा केंद्रीय संसदीय मंडळात समावेश करताना विकासाबरोबरच हिंदूत्वालाही नव्या कार्यकारिणीत महत्त्व देण्यात आले आहे.
वरुण गांधी, राजीवप्रताप रुडी, धर्मेंद्र प्रधान, अमित शाह, मुरलीधर राव या तरुण नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करतानाच राजनाथ सिंह यांनी आपल्या कार्यकारिणीत पाच महिला उपाध्यक्ष आणि आठ महिला सचिवांचा समावेश केला आहे. राजनाथ सिंह यांनी आपल्या कार्यकारिणीत अनुभवी नेत्यांसोबत अनेक तरुण महिला व पुरुष नेत्यांना स्थान देण्याचा प्रयत्न केला  आहे.
 भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी अशी :
अध्यक्ष : राजनाथ सिंह.
उपाध्यक्ष (१३) : सदानंद गौडा, मुख्तार अब्बास नकवी, डॉ. सी. पी. ठाकूर, जुएल ओराम, एस. एस. अहलुवालिया, बलबीर पूंज, सत्पाल मलिक, प्रभात झा, उमा भारती, बिजयॉ चक्रवर्ती, लक्ष्मीकांता चावला, किरण माहेश्वरी आणि स्मृती इराणी.
सरचिटणीस (१०) : अनंतकुमार, थावरचंद गहलोत, जगतप्रकाश नड्डा, धर्मेंद्र प्रधान, तापीर गाओ, अमित शाह, वरुण गांधी, राजीवप्रताप रुडी, मुरलीधर राव आणि रामलाल (संघटन महामंत्री).
संयुक्त सरचिटणीस (२) : व्ही. सतीश आणि सौदान सिंह.
सचिव (१५) : श्याम जाजू, भूपेंद्र यादव, कृष्णा दास, अनिल जैन, विनोद पांडे, त्रिवेंद्र रावत, रामेश्वर चौरसिया, आरती मेहरा, रेणु कुशवाह, सुधा यादव, सुधा मलैया, पूनम महाजन, लुईस मरांडी, श्रीमती तामिल इसाई आणि वाणी त्रिपाठी.
कोषाध्यश्र : पीयुष गोयल.
प्रवक्ते (७) : प्रकाश जावडेकर, शाहनवाझ हुसैन, निर्मला सीतारामन, विजय सोनकर शास्त्री, सुधांशू त्रिवेदी, मीनाक्षी लेखी आणि कॅप्टन अभिमन्यू.
महिला मोर्चा अध्यक्ष : सरोज पांडे.
युवा मोर्चा अध्यक्ष : अनुराग ठाकूर.
अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष : डॉ. संजय पासवान.
अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष : फग्गनसिंह कुलस्ते.
अल्पसंख्यक मोर्चा अध्यक्ष : अब्दुल रशीद.
किसान मोर्चा अध्यक्ष : ओमप्रकाश धनकर.
केंद्रीय संसदीय मंडळ (१२) : राजनाथ सिंह (अध्यक्ष), अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, एम. वेंकय्या नायडू, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नरेंद्र मोदी, अनंतकुमार, थावरचंद गहलोत आणि रामलाल.
केंद्रीय निवडणूक समिती (१९) : राजनाथ सिंह (अध्यक्ष), अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, एम. वेंकय्या नायडू, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नरेंद्र मोदी, अनंतकुमार, थावरचंद गहलोत, रामलाल, गोपीनाथ मुंडे,जुएल ओराम, सय्यद शाहनवाझ हुसैन, विनय कटियार, जगतप्रकाश नड्डा, डॉ. हर्षवर्धन आणि सरोज पांडे.
केंद्रीय शिस्तपालन समिती (५) : राधामोहन सिंह (अध्यक्ष), जगदीश मुखी (सचिव), एल. गणेशन, हरी बाबू आणि श्यामनंदन सिंह.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा