गीतकार जावेद अख्तर यांचा आरोप
प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी यावेळी राजकीय क्षेत्रात डोकावून भाजपचे पतंप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेचा सूर उमटवला आहे. अख्तर यांनी थेट नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदासाठी लायक नसल्याचे म्हटले आहे.
मोदींनी स्वत:मध्ये बदल केल्यास मत देईन-धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक
जावेद अख्तर म्हणाले, “नुसते गुजरातमधील दंगलींचा डाग त्यांच्यावर नाही. या डागाबरोबर ते लोकशाहीला न जुमाननारे नेते असल्याचाही डाग त्यांच्यावर आहे.” गुजरातमध्ये सलग तिसऱयांदा मोदींची सत्ता प्रस्थापीत झाल्याबद्दल अख्तर म्हणाले की, “गुजरातमधील त्यांचा विजय म्हणजे लोकशाहीवर गदा आणण्याची गोष्ट झाली आहे. सलग तिसऱयांदा विजय म्हणजे लोकशाहीला आव्हान देण्यासारखे मोदींनी केले आहे.” तसेच मोदी गुजरातमधील मंत्र्यांना एका शिपायासारखी वागणूक देत असल्याचा आरोप करत जावेद अख्तर यांनी मग असा नेता देश कसा काय चालवू शकतो? असा सवालही उपस्थित केला आहे.
दिल्ली निवडणुकीत मोदींचा केवळ धावता दौरा
अख्तर यांनी यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्तुतीसुमनेही गायली. गेल्या तीन दिवसात बिहारमधील नागरिकांच्या स्वभावातील माझ्या अनुभवावरून आणि याआधी २०१२ साली माझ्या बिहार भेटीवरून तेथे सकारात्मक बदल घडताना दिसत असल्याचे म्हणत जावेद अख्तर यांनी नितीश कुमार यांना सुप्रशासनाची पोचपावती दिली.
मोदींचे घुमजाव; शोभन सरकार यांच्या तपस्येला सलाम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi treated ministers in gujarat like chaprasis javed akhtar
Show comments