भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना व्हिसा देण्याच्या अमेरिकेच्या धोरणात कुठलाही बदल झालेला नाही, असे स्पष्टीकरण ओबामा प्रशासनाच्या परराष्ट्र प्रवक्तया जेन साकी यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, की अजून तेथे निवडणुका झालेल्या नाहीत मोदी यांनी व्हिसासाठी अर्ज केला तर इतरांप्रमाणेच त्यांच्या अर्जाची छाननी करून नेहमीच्या प्रक्रियेनुसार विचार केला जाईल. मोदी पंतप्रधान झाले तर अमेरिका त्यांना व्हिसा देईल, असे वक्तव्य अमेरिकेच्या दक्षिण व मध्य आशिया विषयक सहायक परराष्ट्रमंत्री निशा देसाई बिस्वाल यांनी केले होते त्यावर साकी यांनी आज हा खुलासा केला. भारतातील लोकशाही मार्गाने निवडल्या गेलेल्या नेत्याचे अमेरिका भागीदार म्हणून स्वागतच करील, असेही बिस्वाल यांनी सांगितले होते. भारत हा मोठा लोकशाही देश आहे. मोदी निवडणुकीनंतर पंतप्रधान झाले तर त्यांना अमेरिका व्हिसा देईल असे सूचित करणारे वक्तव्य निशा बिस्वाल यांनी केले होते.
मोदींना व्हिसा देण्याबाबत धोरणात बदल नाही
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना व्हिसा देण्याच्या अमेरिकेच्या धोरणात कुठलाही बदल झालेला नाही, असे स्पष्टीकरण ओबामा प्रशासनाच्या परराष्ट्र प्रवक्तया जेन साकी यांनी केला आहे.
First published on: 09-03-2014 at 05:18 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi visa us