गुजरात निवडणुकीत बुधवारी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर भाजपचे पंतप्रधापदाचे उमेदवार नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारासाठी गुरूवारी आंध्र प्रदेशमध्ये दाखल झाले. मोदी आज राज्यात पाच सभा घेणार आहेत. परंतू तत्पूर्वी त्यांनी तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले आणि मंदिरात विशेष पूजाही केली. त्यावेळी राज्यातील भाजपचे बडे नेते आणि तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू हेदेखिल उपस्थित होते.
आंध्र प्रदेशातील नेल्लोर, गुंटुर, भामावरम, मदनपल्ले आणि विशाखापट्टणम या ठिकाणी मोदींच्या सभा होणार आहेत.

Story img Loader