लोकसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम नागरिकांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना मत न दिल्यास, मोदी मुस्लिमांना अॅसिड वापरून जाळून टाकतील असे खळबळजनक वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केले आहे.
निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत तशा राजकीय टीकांमध्ये तीव्रता वाढू लागली असल्याची ही चिन्हे दिसू लागली आहेत. उत्तरप्रदेश मंत्रिमंडळातील अल्पसंख्यांक व शहरविकासमंत्री म्हणून काम पाहणारे आझम खान म्हणाले की, “उत्तरप्रदेशातील मुस्लिम नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलीत काय झाले? हे सर्वांसमोर आहे. त्यामुळे मोदींना मत दिले नाही, तर ते मुस्लिमांना अॅसिडने जाळून टाकतील अशी त्यांनी वागणूक आहे. गुजरातमध्येही असेच चित्र आहे. गुजरातमध्ये रहायचे असेल, तर मोदींनाच मत दिले पाहिजे अशी निती तेथे वापरण्यात येते. रक्ताने हात माखलेला व्यक्ती भारताचा पंतप्रधान कधीच होऊ शकत नाही.” असेही आझम खान म्हणाले.
…नाहीतर मोदी मुस्लिमांना अॅसिडने जाळतील- आझम खान
लोकसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम नागरिकांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना मत न दिल्यास, मोदी मुस्लिमांविरोधात अॅसिड वापरून जाळून टाकतील असे खळबळजनक वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केले आहे.
First published on: 03-03-2014 at 03:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modi will burn muslims with tezaab says azam khan