मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प हा शेतकरी मध्यमवर्गीय आणि कामगारांना बंपर लॉटरी देणारा ठरला आहे. हंगामी अर्थमंत्री पियूष गोयल यांनी शेतकरी, मध्यमवर्गीय आणि कामगारांना दिलासा देणाऱ्या घोषणांची मोठी यादीच या अर्थसंकल्पामध्ये वाचली आहे. पाच लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याबरोबर शेतकऱ्यांसाठीही अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पाबद्दल अनेक नेत्यांनी ट्विटवरुन आपले मत व्यक्त केले आहे.

प्रगतीच्या दिशेने देशाला घेऊन जाणारे बजेट: अरुण जेटली

नवीन भारतासाठीचे बजेट: राजनाथ सिंह

पाच लाखांपर्यंत करमुक्ती मोठा निर्णय: अमित शाह</p>

हे बजेट म्हणजे सबका साथ सबका विकास: नितीन गडकरी

लोकांनी लोकांसाठी सादर केलेले बजेट: सुरेश प्रभू

समाजातील प्रत्येकाच्या भल्यासाठी: राज्यवर्धन सिंग राठोड

घरातील पैसा वाढणार: स्मृती इराणी

शेतकरी, गरीब आणि सामान्यांसाठीचे बजेट: नकवी

गरिबांच्या कल्याणासाठीचे बजेट: सुषमा स्वराज

नवीन भारताचा पाया उभारणारे बजेट: निर्मला सितारमन

सर्वसमावेशक बजेट: प्रकाश जावडेकर

सामान्य माणसासाठीचे बजेट: देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र)

एकीकडे मोदींच्या मंत्रिमंडळामधील नेत्यांनी आणि भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाचे कौतूक केले असतानाचा दुसरीकडे काँग्रेस आणि विरोधीपक्षांनी हे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सादर केलेला अर्थसंकल्प असल्याची टिका केली आहे.

Story img Loader