पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे घेऊन जातील पण त्यांच्या परदेश दौऱयांना प्रत्यक्षात कृतीची जोड असायला हवी, असे मत रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाकबगार नेते आहेत. ते देशाला जगासमोर उत्तमरित्या सादर करू शकतात यात काहीच शंका नाही. त्यांच्या परदेश दौऱयांमुळे जगाचा भारताकडे बघण्याच्या दृष्टीकोनात सकारात्मक बदल देखील होताना दिसत आहे, असे रघुराम राजन एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
परदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी नरेंद्र मोदी परदेश दौऱयांमध्ये भारत एक उत्तम बाजारपेठ असल्याचे पटवून देत आहेत, हे वाखाणण्याजोगे आहे. पण वास्तवात येथे गुंतवणुकदारांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागल्यास विरोधाभास निर्माण होईल. त्यामुळे मोदींच्या घोषणांना प्रत्यक्षात कृतीची जोड देऊन देशात सुधारणांमध्ये सातत्य राहिल यासाठी प्रयत्नशील राहायला हवे, असे राजन यांनी सांगितले. तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या विचारांशी रिझर्व्ह बँक प्रत्येकवेळी सहमत असेलच असे नाही, पण केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकचे संबंध घट्ट असल्याचेही ते पुढे म्हणाले.
मोदींच्या परदेश दौऱयांना प्रत्यक्षात कृतीची जोड हवी – रघुराम राजन
परदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी नरेंद्र मोदी परदेश दौऱयांमध्ये भारत एक उत्तम बाजारपेठ असल्याचे पटवून देत आहेत
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
First published on: 30-09-2015 at 19:42 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modis foreign visits need to be backed up with action on ground raghuram rajan