भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यांना बलात्कारप्रकरणी केलेल्या विधानावरून टीका केली. तसेच यावेळी मोदींनी मुझफ्फरनगर दंगली मुद्द्यावरून त्यांचावर तोंडसुख घेतले. मुलायमसिंह यांच्याबाबत एक अडचण आहे, ती म्हणजे नको त्या ठिकाणी ते कठोर भूमिका घेतात, आणि ज्या ठिकाणी कठोर भूमिका घेण्याची गरज असते तिथे त्यांच्याकडून मवाळ भूमिका घेतली जाते अशा शब्दांत मोदींनी मुलायमसिंह यांच्यावर टीका केली. समाजातील स्त्रियांवर अत्याचार होतात, मुझफ्फरनगर दंगलीतील पिडीतांचे भुकेमुळे बळी जात आहेत, तरीसुद्धा समाजवादी पक्षाकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. मुझफ्फरनगर दंगलीतील पिडीतांना न्याय देण्यासाठी मुलायमसिंह यादव कणखर भूमिका घेण्यात कमी पडल्याचे नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत सांगितले.
मुलायमसिंहांच्या मनात बलात्काऱ्यांविषयी सहानुभूती – नरेंद्र मोदी
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यांना बलात्कारप्रकरणी केलेल्या विधानावरून टीका केली.
First published on: 19-04-2014 at 11:22 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modis jibe at mulayam balaatkariyon ke liye netaji ka mann ekdum mulayam hai