देशातील सर्वच राज्यांमध्ये देशासाठी लढा दिलेले आणि प्रसंगी बलिदान केलेले नेते आहेत. मात्र, तुम्हाला त्यांची काधी आठवण होत नाही? तुमच्या पक्षाला आणि रा. स्व. संघाला गेल्या ७० वर्षांत त्यांची आठवण का झाली नाही? असा सवाल करताना सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभारणे हा मोदींचा केवळ स्टंट आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.


खर्गे म्हणाले, आम्ही सरादर पटेलांचा अत्यंत आदर करतो, त्यामुळे आम्हाला यावर अधिक भाष्य करायचे नाही. मात्र, मोदींचे यावरुन राजकारण सुरु असल्याचे मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो. मोदी राजकारणाबरोबरच जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत. तसेच मोदींना स्वतः अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ते यावरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावर आगामी २०१९च्या निवडणुकीत लोक कशी प्रतिक्रिया देतात हे पहावे लागणार आहे. मला वाटतं ते विचारपूर्वक निर्णय घेतील.

दरम्यान, माध्यमांनी खर्गे यांना पंतप्रधानपदाबाबत विचारणा केली त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, पंतप्रधानपदी विराजमान होण्याची माझी वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. मात्र, माझे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहेत. त्यामुळे हे नेते जे सांगतील ते मी करेन. जर काँग्रेसची सहमती असेल तर काँग्रेसमधील वरिष्ठ नेते या नात्याने तुम्हालाही पंतप्रधान व्हावेसे वाटत नाही का? असा प्रश्न पत्रकारांनी खर्गेंना विचारला होता.

Story img Loader