Mohammad Akhlaq Mob Lynching Case:२०१५ साली उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगरच्या दादरी परिसरात मोहम्मद अखलाक नावाच्या ५२ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. ईदच्या दिवशी गोमांस खाल्ल्याच्या कारणातून जमावाने त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात अखलाक यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दादरी परिसरात स्थानिक प्रशासनाने कलम १४४ नुसार जमावबंदीचा आदेश दिला होता. पण भाजपा नेते संगीत सोम यांनी या कायद्याचं उल्लंघन करत एका जाहीर सभेला संबोधित केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यामुळे संगीत सोम यांच्यावर जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर येथील न्यायालयाने भाजपा नेते संगीत सोम यांनी भादवि कलम १८८ अंतर्गत दोषी ठरवलं असून त्यांना शिक्षा म्हणून त्याला ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रदीप कुमार कुशवाह यांनी हा निकाल दिला आहे.

२०१५ साली गौतम बुद्ध नगरच्या दादरी परिसरात ५२ वर्षीय मोहम्मद अखलाक यांची एका जमावाने हत्या केली होती. अखलाक यांनी ईदच्या दिवशी गोमांस खाल्ले होते आणि काही मांस नंतर खाण्यासाठी साठवून ठेवले होते, असा आरोप जमावाने केला होता. यातूनच संतप्त झालेल्या जमावाने त्यांची निर्दयी हत्या केली होती.

हेही वाचा- ही हिंदुत्वाचीच देण; सरसंघचालक भागवत यांना असदुद्दीन ओवेसींचं प्रत्युत्तर

या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने दादरी परिसरात कलम १४४ (जमावबंदी) लागू केले होते. या कलमानुसार, दादरी परिसरात चार किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली होती. असं असूनही भाजपा नेते संगीत सोम यांनी एका जाहीर सभेला संबोधित केलं होतं. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं असून ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.