भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. शमीच्या निकटवर्तीयांच्या मते, दोघांमधील भांडणाचे मूळ कारण उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथील कोट्यावधी रुपयांचे फार्महाउस आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शमीने अमरोहा येथील अली नगर गावात जे फार्म हाऊस विकत घेतले होते तेथे स्पोर्ट्स अकादमी सुरू करण्याची त्याची इच्छा आहे. हसीनला मात्र शमीचा हा निर्णय फारसा मान्य नव्हता. हसीनला अमरोहाएवजी पश्चिम बंगालमध्ये मालमत्ता विकत घ्यायची होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शमीने ६० एकरची जमीन विकत घेतली. या जमिनीचा बाजार भाव साधारणपणे १२ ते १५ कोटी रुपयांपर्यंत होतो. शमीने त्याच्या फार्महाऊसचे नाव पत्नीच्या नावेच ठेवले आहे. पण कायदेशीररित्या या जागेवर हसीनचा कोणताही अधिकार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरोहमध्ये मालमत्ता विकत घेतल्यानंतरच शमी- हसीनच्या सुखी संसारात वादाची ठिणगी पडायला सुरूवात झाली. शमीची जन्म भूमी अमरोह आहे. पण तो सध्या पश्चिम बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. शिवाय हसीनही कोलकाताची राहणारी आहे.

याआधी हसीनने शमीवर अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप केला होता. या आरोपांसोबत हसीनने हेही सांगितले होते की शमी आणि त्याच्या परिवाराने तिला शारीरिक आणि मानसिक त्रासही दिला आहे. हसीनने शमीविरोधात कोलकाता पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. हसीनने शमीचे एका पाकिस्तानी महिलेसोबत संबंध असल्याचे म्हटले. त्याने दुबईत राहून मॅच फिक्सिंग केल्याचेही म्हटले. हसीनाने केलेल्या सर्व आरोपांचे शमीने खंडन केले आहे. देशाला धोका देण्यापेक्षा मी मरण पत्करेन असे स्पष्टीकरण शमीने दिले. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.