भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेल्या आगामी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिकेला मुकावे लागणार आहे. शमीच्या पायाच्या स्नायुंना झालेल्या दुखापतीमुळे त्याला आणखी सहा आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले. त्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी ट्विट करून यासंबंधीची माहिती दिली. वैद्यकीय तपासणीत शामीच्या डाव्या गुडघ्याला दुसऱ्या दर्जाची दुखापत कायम असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला आणखी चार ते सहा आठवडे मैदानात उतरता येणार नाही, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, शामीच्या जागी आता संघात भुवनेश्वर कुमारचा समावेश होण्याची शक्यता आहे.
आगामी विश्वचषकासाठी आम्हाला हा दौरा उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर या संघात बरेच युवा खेळाडू आहेत. या खेळाडूंना हा दौरा म्हणजे चांगली संधी असेल. या दौऱ्यात त्यांना चांगला अनुभव मिळेल, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने काही दिवसांपूर्वी सांगितले होते.

Story img Loader