RSS chief Mohan Bhagwat : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी घरवापसी कार्यक्रमाचं कौतुक केलं होतं. संघाने पुनर्परिवर्तनाचं कार्य केलं नसतं तर आदिवासींचा एक भाग देशद्रोही झाला असता, असं प्रणब मुखर्जी म्हणाले होते, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. ते राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार सोहळ्यात बोलत होते. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस आणि विहिंपते नेते चंपत राय यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या भाषणात भागवत म्हणाले, “डॉ. प्रणबकुमार मुखर्जी राष्ट्रपती होते. तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो होतो. संसदेत घरवापसीवरून प्रचंड घमासान सुरू होतं. पण ते म्हणाले की तुम्ही काही लोकांना परत आणलं आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. असं कसं करता तुम्ही? असं केल्याने वाद होतात. कारण ते राजकारण आहे. मीही आज जर काँग्रेस पक्षात असतो, राष्ट्रपती नसतो, तर मी संसदेत हेच केलं असतं. पण तुम्ही लोकांनी हे जे काम केलंय, (ते केलं नसतं तर) त्यामुळे भारतातील ३० टक्के आदिवासी देशद्रोही बनले असते, असं त्यांनी म्हटलं.”

हेही वाचा >> Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप

“मनापासून धर्मांतर करायची इच्छा झाली तर काही हरकत नाही. प्रत्येक धर्म सारखाच आहे. प्रत्येक धर्म एकाच जागेवर पोहोचवतो. प्रत्येकाला आपला धर्म निवडण्याचा अधिकार आहे. पण हे जबरदस्तीने होत असेल, तर याचा अर्थ अध्यात्मिक प्रगती होत नाही”, असंही माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले होते, असा दावा मोहन भागवत यांनी केला.

प्रणब मुखर्जींच्या मुलीची प्रतिक्रिया काय?

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांच्याशी इंडियन एक्स्प्रेसने संपर्क साधला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आदिवासींचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर होणे हा संघ परिवाराच्या प्रमुख मुद्द्यांपैकी एक आहे. याविरोधात वनवासी कल्याण आश्रमासारख्या संस्थांद्वारे अनेक दशकांपासून आंदोलन सुरू आहे. संघाशी संबंधित अनेक संघटना गेल्या काही वर्षांपासून धर्मांतरित आदिवासींना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्यासाठी आदिवासीबहुल भागात मोहीम राबवत आहेत.