Mohsen Shekari iranian man last wish video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मला फाशी दिल्यानंतर कोणीही दु:ख वाटून घेऊ नये असं म्हणताना दिसत आहे. तसेच माझ्या कबरीसमोर नमाज पठणही करु नका असंही या व्यक्तीने सांगितलं आहे. तसेच आपली शेवटची इच्छा व्यक्त करताना सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर सेलिब्रेशन करा.

समोर आलेल्या माहितीनुसार, फाशी देण्याआधी अंतिम इच्छा सांगणाऱ्या या व्यक्तीला इराण सरकारविरोधात प्रदर्शन करताना अटक केली होती. इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनात अटक करण्यात आलेल्या २३ वर्षीय माजीदरेजा रेहनवरदला मशहद शहरामध्ये सोमवारी सर्वांसमोर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

boyfriend killed his girlfriend in pune
पुणे : प्रेमसंबंधातून महिलेवर चाकूने वार करुन खून,प्रियकराला अटक
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
A case has been filed against parents in the case of forced marriage of a minor girl Pune news
अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह प्रकरणी आई-वडिलांसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल; पीडिता गर्भवती झाल्यानंतर प्रकार उघड
Controversy over the initials Rama written on the body of a goat
बकऱ्याच्या अंगावर लिहिलेल्या राम आद्याक्षरावरून वाद; न्यायालयात नेमके काय घडले?
father of rape victim change birth record to save accused
Jaipur Crime News : बाप नव्हे हैवान! बलात्कारी आरोपीला वाचवण्यासाठी स्वतःच्या मुलीची बदलली जन्मतारीख
Loksatta chaturang Friends friendship Express implicit relationship
माझी मैत्रीण: व्यक्त-अव्यक्त नातं
bombay hc impose fine of two lakhs to accused and victim while canceling the rape case
बलात्काराचा गुन्हा रद्द करताना आरोपी आणि पीडितेला प्रत्येकी दोन लाखांचा दंड; सैनिकांसाठी दंडाची रक्कम वापरण्याची सूचना
Bank employee stabbed to death in pune
धक्कादायक : किरकोळ वादातून बँक कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून खून, हडपसर भागातील घटना; तीन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात

चार दिवसांपूर्वी इराण सरकाने मोहसन शेकारी नावाच्या तरुणाला सरकारविरोधी आंदोलनामध्ये सहभागी झाल्याच्या कारणास्तव फाशी दिली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरुन विरोध केला जात असला तरी कोणत्याही आंदोलनकर्त्याला अशाप्रकारे फासावर लटकवण्याचे पहिलेच प्रकरण आहे. माजीदरेजाने आंदोलनादरम्यान सुरक्षा दलातील जवानांची हत्या केली आणि त्यांना जखमी केल्याचे आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले होते.

बेल्जियममधील खासदार सफई आणि बीबीसीच्या पत्रकार सबस्टाईन उसर यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये आरोपी मजीदरेजा रेहनवरदच्या डोळ्यांवर पट्टी बांढण्यात आली आहे. आपल्या शेवटच्या इच्छेबद्दल बोलताना रहनवरदने व्हिडीओमध्ये, “माझी अशी इच्छा नाही की कोणीही येऊन माझ्या कबरीवर शोक व्यक्त करावा. मला हे नकोय की कोणी येऊन माझ्या कबरीवर नमाज पठण करावं. मला वाटतं की संगीत वाजवून आनंद साजरा केला जावा,” असं रेहनवरद म्हणताना दिसत आहे.

माजीदरेजा रेहनवरदला सुनावण्यात आलेली शिक्षा ही सुरक्षा दलातील व्यक्तीची हत्या करणे आणि इतर चार सुरक्षा रक्षकांना जखमी करण्याच्या आरोपात सुनावण्यात आली आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ओस्लोमधील इराण ह्यूमन राइट्सचे निर्देशक महमूद अमीरी यांनी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान रेहनवरदला त्याच्यावरील आरोप मान्य करण्यासाठी भाग पाडलं. अमीरीने रेहनवरदला अटक केल्यानंतर २३ दिवसांमध्येच फाशीची शिक्षा सुनावणं हा इराणच्या नेत्यांनी केलेला गंभीर गुन्हा आहे, असं म्हटलं आहे.

इराणमधील आंदोलनावर नजर ठेवणाऱ्या १५०० तनवीर नावाच्या ट्वीटर हॅण्डलने मजादरेजा रेहनवरदला फासावर लटकवण्यात आल्याची माहिती कुटुंबाला देण्यात आली असल्याचं सांगितलं. रेहनवरद आणि त्याच्या आईच्या भेटीचे जुने फोटो शेअर करताना या महिलेला अंदाजही नसेल की तिचा मुलगा मरण पावणार आहे, असं म्हटलंय.

इराणममध्ये पोलीस कोठडीत असतानाच महसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर हिजाबविरोधी आंदोलनाने जोर पकडला आहे. १९७९ नंतरचं इराणमधील ही सर्वात मोठं आंदोलन असल्याचं सांगितलं जात आहे.