आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना कथित दिल्ली मद्यविक्री घोटाळा प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर रोजी ५ दिवसांची सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावली होती. या कोठडीनंतर संजय सिंह यांना १३ ऑक्टोबर रोजी राउज एवेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी सिंह यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यापुढची सुनावणी २७ ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान, संजय सिंह यांनी या कोठडीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

ईडीने अटकेचं कारण सांगितलं नसून ही अटक बेकायदेशीर ठरवावी, अशी मागणी संजय सिंह यांनी केली होती. परंतु, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वर्णकांता यांनी संजय सिंह यांची याचिका फेटाळली आहे.

12 lakh fraud by cyber thieves Pune news
मुंबई उच्च न्यायालयाकडून अटक वाॅरंटची बतावणी; सायबर चोरट्यांकडून एकाची १२ लाखांची फसवणूक
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
supreme court grants bail to delhi cm arvind kejriwal in cbi sase
केजरीवाल यांना जामीन; सीबीआयवर ताशेरे ओढत न्यायालयाकडून दिलासा; साडेतीन महिन्यांनंतर तुरुंगाच्या बाहेर
Submitted fake document in high court to get illegal benefit of 20 crores
२० कोटींचा बेकायदा लाभ घेण्यासाठी उच्च न्यायालयात बनावट कागदपत्र सादर, चौघांविरोधात गुन्हा दाखल
Jaideep Apte police custody, Dr Patil,
शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ, बांधकाम सल्लागार डॉ. पाटील याला न्यायालयीन कोठडी
Jaydeep Apte, the sculptor of the Shivaji statue that collapsed in Sindhudurg arrested.
Jaydeep Apte : मोठी बातमी! शिल्पकार जयदीप आपटेला पाच दिवसांची पोलीस कोठडी
Sandip Ghosh RG Kar Medical College
Kolkata Rape Case : “आर. जी. कर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष मोठ्या रॅकेटचा भाग”, सीबीआयचा न्यायालयात दावा!
Sugarcane, Delhi High Court, Supreme Court,
ऊस दराचा लढा दिल्ली उच्च न्यायालयात; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

ईडीने ६ ऑक्टोबर रोजी सिंह यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी छापे टाकले, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ईडीने संजय सिंह यांच्या चौकशीसाठी १० दिवसांची कोठडी मागितली होती. परंतु, न्यायालयाने ईडीला १० ऑक्टोबरपर्यंत सिंह यांची कोठडी मंजूर केली. आपल्याला झालेली अटक हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला अन्याय आहे, ते आगामी निवडणुकीत पराभूत होतील, अशी टीका संजय सिंह यांनी केली होती.

संजय सिंह यांच्याविरोधातले पुरावे जाहीर करावेत, असं आव्हान ‘आप’ने भाजपाला दिलं होतं. संजय सिंह यांना अटक करून त्यांचा आवाज दाबण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप ‘आप’च्या वरिष्ठ नेत्या अतिशी यांनी केला होता.

हे ही वाचा >> Mahua Moitra : ‘कॅश फॉर क्वेश्चन’ मुळे चर्चेत आलेल्या महुआ मोईत्रा कोण आहेत?

भर न्यायालयात अदाणींचं नाव घेतल्यानं न्यायाधीश संतापले

संजय सिंह यांना १३ ऑक्टोबर रोजी दिल्लीतल्या राउज एवेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी संजय सिंह यांच्या एका कृतीवरून न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाने संजय सिंह यांना आपलं मत मांडण्याची संधी दिली होती. तेव्हा संजय सिंह यांनी ईडीला लक्ष्य करत उद्योगपती गौतम अदाणी यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे न्यायाधीश त्यांच्यावर संतापले होते.