उत्तर प्रदेशातील बरेली येथे माकडाने चार महिन्याच्या बाळाला गच्चीवरुन खाली फेकल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तीन माळ्यांच्या घरावरुन माकडाने बाळाला खाली फेकलं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. बरेलीचे मुख्य वनसंरक्षक ललित वर्मा यांनी घटनेची माहिती मिळाली असून वनविभागाचे एक पथक तपासासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निर्देश उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आपल्या पत्नीसोबत घऱाच्या गच्चीवर फेरफटका मारत होते. यावेळी त्यांचं चार महिन्यांचं बाळही सोबत होतं. यावेळी अचानक तिथे माकडं आली. मी त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न करत पायऱ्यांच्या दिशेने धाव घेतली. यावेळी बाळ हातातून खाली पडलं असता माकडांनी त्याला उचललं आणि गच्चीवरुन खाली फेकून दिलं. गच्चीवरुन खाली पडल्यानंतर बाळाचा जागीच मृत्यू झाला.