संपूर्ण जगावर करोनाचं संकट असताना आता अमेरिकेतील टेक्सासमध्ये ‘मंकीपॉक्स’ व्हायरसचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी २००३ साली अमेरिकेत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले होते. अमेरिकेतील रोग नियंत्रक आणि प्रतिबंधक संस्थेने ही माहिती दिली आहे. मंकीपॉक्सबाधित व्यक्तीला डल्लासमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. रुग्णांने नायजेरियातून अमेरिकेत प्रवास केला होता. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना मंकिपॉक्सचा संक्रमण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी वैद्यकीय यंत्रणा तपासणी करत आहेत. हा रुग्ण ज्या विमानाने अमेरिकेत आला, त्या विमानातील प्रवाशांची माहिती घेतली जात आहे. रुग्णाने दोन विमानं बदलत अमेरिकेत प्रवेश केला होता. ८ जुलैला नायजेरियातील लागोसमधून अटलँटामध्ये आणि ९ जुलैला अटलँटामधून डल्लासमध्ये प्रवेश केला होता. सध्यातरी मंकिपॉक्सबाबत चिंता करण्याचं कारण नाही, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा