पीटीआय, नवी दिल्ली

मान्सून संपूर्ण देशात पोहोचला असून अंदाज व्यक्त केलेल्या वेळेच्या सहा दिवस आधीच त्याची प्रगती झाली असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिली. विशेष म्हणजे जूनच्या मध्यामध्ये मान्सूनचा वेग मंदावला असूनही तो लवकर संपूर्ण देशात पोहोचला आहे.हवामान विभागाने मंगळवारी एक निवेदन प्रसृत करून माहिती दिली की, ‘‘नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये प्रगती केली आहे. त्यामुळे मान्सूनने २ जुलैलाच संपूर्ण देश व्यापला आहे, सामान्यपणे ही तारीख ८ जुलै असायला हवी होती.’’

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon rains throughout the country flood situation in assam amy
First published on: 03-07-2024 at 07:02 IST