चंद्रावर तसेच व्हेस्टासह इतर लघुग्रहांवर मोठा अवकाशीय पदार्थ अतिशय वेगाने आदळला होता असे नासाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.नासाच्या ल्युनर सायन्स इन्स्टिटय़ूटन (एनएलएसआय) व्हेस्टा हा लघुग्रह व चंद्र यांचा अशाप्रकारे संबंध जोडून दाखवला आहे. आघात सिद्धांताला पुष्टी देणारे हे संशोधन नेचर जिओसायन्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. आपल्या सौरमालेचा इतिहास समजून घेण्यासाठी हे आंतरविद्याशाखीय संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे, असे एनएलएसआयचे संचालक येव्हन पेडलटन यांनी सांगितले.
चंद्र हा व्हेस्टा या लघुग्रहापासून फार दूर असला तरी तो मंगळ व गुरू यांच्या दरम्यानच्या लघुग्रह पट्टय़ात आहे. शनी व गुरू या वायू ग्रहांची सध्याची स्थिती येण्यामुळे लघुग्रह पट्टय़ात काही उलथापालथी झाल्या होत्या ही घटना अब्जावधी वर्षांपूर्वी झाली होती. अपोलो मोहिमेत चंद्रावरून आणलेल्या दगडांचा वापर या आघात सिद्धांताच्या संशोधनासाठी करण्यात आला आहे.

Story img Loader