उत्तर प्रदेशमधल्या मुरादाबाद जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीला तिच्या घराशेजारी राहणाऱ्या ३-४ जणांकडून छेडछाडीचा सामना करावा लागत होता. नेहमीच्या छेडछाडीला कंटाळून या मुलीने आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने तिला त्रास देणाऱ्यांची नावं लिहिली आहेत. त्यात तिने चार जणांविरोधात छळ केल्याचा आणि पोलिसांनी याप्रकरणी कारवाई न केल्याचा आरोप केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मुलीच्या कुटुंबियांनी ८ मार्च रोजी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या चार जणांविरोधात छेडछाड केल्याची तक्रार दाखल केली होती. या मुलीच्या कुटुंबियांनी दावा केला आहे की, पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही.

या मुलीने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, चार जण गेल्या अनेक दिवसांपासून तिला त्रास देत होते. त्यामुळे तिने त्यांची पोलिसांत तक्रार केली. परंतु पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. कारण हे आरोपी ‘श्रीमंत’ आहेत. तिने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, “या लोकांनी माझं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. माझ्यात आता या लोकांचा सामना करण्याची हिंमत नाही. परंतु माझ्या कुटुंबियांना त्रास होऊ नये असं वाटतं. महोदय (अधिकारी), आता तरी तुम्ही माझं ऐकाल का? माझ्या मृत्यूनंतर तुम्ही या लोकांना शिक्षा द्या. जेणेकरून गरीबांच्या मुलीदेखील जगू शकतील आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतील.”

हे ही वाचा >> ऑफिसमध्ये ओसामा बिन लादेनचा फोटो लावणं पडलं महागात; विद्युत विभागाच्या अभियंत्याने गमावली नोकरी

नराधम तिला चाकूचा धाक दाखवायचे

या चिठ्ठीत तिने आरोप केला आहे की, त्या नराधमांनी तिला मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भितीने तिने शाळेत जाणं बंद केलं होतं. कारण ते तिला त्रास द्यायचे. तिने पत्रात सांगितलं आहे की, “ते नराधम माझ्या आई-वडिलांना मारून टाकण्याची धमकी द्यायचे. घराच्या टेरेसवर चढून मला चाकूचा धाक दाखवायचे. माझ्या पालकांना हे समजल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी काहीच केलं नाही.”

दरम्यान, मुरादाबाद पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. विकेश आणि अमृत अशी त्यांची नावं आहे. तर इतर दोन जण फरार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moradabad school girl commit suicide says suicide says molesters turn my life into hell in note asc