अलीकडे अँड्राईड फोनचा जमाना आहे व त्याच्या आपण आहारी गेलो आहोत, अनेक जण बँकेचे व्यवहारही मोबाईलवरच करतात पण पुरेशी काळजी न घेतल्यास ते धोकादायक आहे. अमेरिकेतील सुरक्षा संशोधकांच्या मते हॅकर्स मोबाईल फोन हॅक करून तुमचे पैसे व खातेच चोरू शकतात.
कास्परस्की लॅबसने इंटरपोल सोबत केलेल्या संशोधनानुसार ६० टक्के मालवेअर प्रोग्राम्सनी ऑगस्ट २०१३ ते जुलै २०१४ दरम्यान अँड्रॉइड फोनवर हल्ले करून ते हॅक केले व पैसे चोरले तसेच बँक खात्याची  माहितीही चोरली. या अहवालानुसार अँड्रॉइडची बाजारपेठ आता ८५ टक्के आहे व ९८ टक्के मालवेअर्सचा वापर केला गेला जात आहे. इतर ऑनलाईन कार्यपद्धतींप्रमाणे हॅकर्स मोबाईलचे नियंत्रण ताब्यात घेतात. त्या मोबाईलचे इंटरनेट  त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर इंटरनेट बँकिंगचा फुगा फुटतो.
कास्परस्कीच्या अहवालानुसार ५,८८,००० अँड्रॉइड वापरकर्त्यांच्या मोबाईलमध्ये आर्थिक मालवेअर हल्ले करण्यात आले ते गेल्या बारा महिन्यांपेक्षा बारा पट अधिक आहेत.
स्मार्टफोनवरून पैशांचे व्यवहार केले जातात हे हॅकर्सना माहिती आहे त्यामुळे ते अँड्रॉइडला लक्ष्य करणारे मालवेअर तयार करतात. अनेकदा गुगल प्ले व अ‍ॅमेझॉन अ‍ॅप स्टोअरवरून आपण अ‍ॅप थर्ड पार्टी डाऊनलोड करतो व त्यामुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात त्यामुळे अविश्वनीय स्रोतावरून कुठलेही अ‍ॅप किंवा प्रोग्राम डाऊनलोड करू नयेत. रशियातील जास्तीत जास्त अँड्रॉइड वापरकर्त्यांना फटका बसला असून युक्रेन, स्पेन, ब्रिटन, व्हिएतनाम, मलेशिया, जर्मनी, भारत व फ्रान्स या देशांचाही त्यात समावेश आहे. १२ महिन्यांच्या पाहणीत ३४ लाख मालवेअर सापडले आहेत व ऑगस्टपासून त्यांचे हल्ले दहापट वाढले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा