‘केंद्रीय अन्वेषण विभागा’ला (सीबीआय) अधिक स्वायत्तता देण्यासाठी केंद्र सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. सीबीआयचे विधी संचालनालय यापूर्वी कायदा मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करत असे. मात्र आता सीबीआय संचालकांच्या अखत्यारीत हा विभाग काम करेल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
सीबीआयचे विधी संचालनालय आणि त्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सीबीआय संचालकांचा आदेश अंतिम राहील. या अधिकाऱ्यांची कामे ठरवण्याचा अधिकारही सीबीआय संचालकांना असेल.
विधी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांसंदर्भातही सीबीआय संचालकच निर्णय घेतील, त्याशिवाय विभागाचा वार्षिक गोपनीय अहवालही सीबीआय संचालकांच्या अखत्यारीतच तयार होईल, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.
संसदेच्या दोन्ही सभागृहांत नुकत्याच संमत झालेल्या लोकपाल विधेयकानुसार विधी संचालनालयाचे हे अधिकार सीबीआय संचालकांना देण्यात आले आहेत.
सीबीआयला आता अधिक स्वायत्तता
‘केंद्रीय अन्वेषण विभागा’ला (सीबीआय) अधिक स्वायत्तता देण्यासाठी केंद्र सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-12-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More teeth to cbi prosecution wing now under cbi director