वायू सेनेने केलेल्या हवाई हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तालिबानला काल(रविवार) मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलं, जेव्हा वायू सेनेने शेबर्गन शहरात त्यांच्या एकत्र येण्याच्या ठिकाणांना लक्ष्य केले. या हल्ल्यात २०० पेक्षा जास्त तालिबान सदस्यांचा खात्मा झाला.
अफगाणिस्तान सुरक्षा मंत्रालयाचे अधिकारी फवाद अमान यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती देताना सांगितले, ”आज सायंकाळी वायु सेनेकडून त्यांच्या सभा व लपून बसण्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्यानंतर, शेबर्गन शहरात २०० पेक्षा अधिक तालिबान दहशतवादी मारले गेले. हवाई हल्ल्यामुळे मोठ्यासंख्येने त्यांचा शस्त्रसाठा व दारूगोळा तसेच त्यांची १०० पेक्षा अधिक वाहन नष्ट झाली.”
#Details: More than 200 terrorist Taliban were killed in #Cheberghan city after Air Forces targeted their gathering and hideouts today evening. A large amount of their weapons and ammunition and more than 100s of their vehicles were destroyed as a result of the airstrikes.
— Fawad Aman (@FawadAman2) August 7, 2021
जावजान प्रांताच्या शेबर्गन शहरातील तालिबानच्या जमावाला आज सायंकाळी बी-52 बॉम्बरने निशाणा बनवलं गेलं. अशी माहिती देखील काल अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयातील अधिकाऱ्याने ट्विटद्वारे दिली होती.
#Breaking: Taliban’s gathering was targeted by B-52 in #Shebergan city, Jawzjan province today evening at 6:30pm. The #terrorists have suffered heavy casualties as a result of US Air Forces #airstrike
— Fawad Aman (@FawadAman2) August 7, 2021
तालिबानच्या जमावाला आज सायंकाळी साडेसहा वाजता शेबर्गन शहर, जोज्जान प्रांतात बी-52 द्वारे लक्ष्य करण्यात आलं होतं. अमेरिकेच्या वायुसेनेच्या हवाई हल्ल्यामुळे दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असं अफगाणिस्तानच्या सुरक्षा मंत्रालयातील अधिकाऱ्याने ट्विट केलं आहे.
या अगोदर एका पाकिस्तानी दहशतवाद्यास गझनी प्रांतीय केंद्राबाहेरील भागात अफगाणिस्तानच्या कमांडो दलाकडून अटक करण्यात आली होती. त्याचा दहशतवादी कारवाया आणि नागरिकांच्या हत्यांमध्ये सहभाग होता.