मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर केवळ चांगला क्रिकेटपटूच नसून, तो चांगला माणूसही आहे, या शब्दांत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सचिनचे कौतुक केले. सचिन तेंडुलकर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
सचिन आणि राहुल गांधी यांची चांगली मैत्री आहे. सचिनबद्दल राहुल गांधी म्हणाले, मी त्याला खूप चांगलं ओळखतो. तो उत्तम क्रिकेटपटू आहे. पण त्याहीपेक्षा तो चांगला माणूसही आहे. त्यामुळेच तो मला जास्त भावतो. माझ्यादृष्टीने त्याच्या या चांगुलपणाला जास्त महत्त्व आहे.
सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱया कसोटी सामन्यानंतर सचिन कसोटीसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. मुंबईमध्ये येत्या १४ ते १८ नोव्हेंबरदरम्यान सचिन आपल्या कारकीर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.

Story img Loader